नवी मुंबई : ऐरोली शिवकॉलनी येथे दुमजली अनधिकृत बांधकाम कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तेथे नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या खोदकामादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकारामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.ऐरोली सेक्टर १ येथील शिवकॉलनीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका अनधिकृत चाळीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होते. त्याकरिता जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असतानाच जमीन खचल्याने दुमजली घर कोसळून हा अपघात घडला. घराच्या भिंती हलत असल्याची चाहूल लागल्याने रहिवाशांची पळापळ सुरू असताना काही क्षणातच संपूर्ण इमारत जमिनीवर कोसळली. त्यामुळे लगतच्या रहिवाशांनीही घाबरून घराबाहेर पळ काढला होता. मोठी जीवितहानी टळली असली तरी, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. शिवकॉलनीतील दोन चाळींच्या पुनर्बांधणीचे काम फिफ्टी- फिफ्टीमध्ये केले जाणार होते. त्यानुसार खाजगी विकासक पटेल याने खोदकामाला सुरुवात केली. मात्र दुर्घटनेनंतर तो फरार झालेला आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे विभाग अधिकारी बाळा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ऐरोलीत अनधिकृत बांधकाम कोसळले
By admin | Updated: June 1, 2015 02:14 IST
ऐरोली शिवकॉलनी येथे दुमजली अनधिकृत बांधकाम कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तेथे नव्याने होत असलेल्या अनधिकृत
ऐरोलीत अनधिकृत बांधकाम कोसळले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}