Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युपत्र वाचताना उद्धवच उपस्थित होते

By admin | Updated: December 11, 2014 02:20 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रचे वाचन करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित होते, अशी माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रचे वाचन करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित होते, अशी माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रवर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने याची न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आह़े त्यात अॅड़ एफ़ डिसोजा यांची सध्या साक्ष सुरू आह़े जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी घेतलेल्या उलटतपासणीत अॅड़ डिसोजा यांन ही माहिती दिली़ याधीही अॅड़डिसोजा यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रत 1997 ते 2क्11 र्पयत आठ ते नऊ वेळा दुरूस्ती केल्याचे न्यायालयाला सांगितले आह़े (प्रतिनिधी)