Join us  

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’कडे उद्धव ठाकरेंची पाठ! राऊत-शेलार यांच्यात मोदींवरून कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:26 AM

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबईत येत असताना शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मोदींच्या अनुषंगाने केलेल्या एका टिष्ट्वटवरुन युतीतील तणाव वाढला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परिषदेला जाणार नसून त्यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा येथे रविवारी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पक्षाने कळविले आहे.

मुंबई : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबईत येत असताना शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मोदींच्या अनुषंगाने केलेल्या एका टिष्ट्वटवरुन युतीतील तणाव वाढला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परिषदेला जाणार नसून त्यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा येथे रविवारी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पक्षाने कळविले आहे.पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ््यावरून खा. संजय राऊत यांनी ‘ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले...तिसरा येऊन जाऊन असतो’, असे टिष्ट्वट केले.राऊत यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. त्यानंतर थोड्याच वेळात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी राऊत यांचा समाचार टिष्ट्वटरवरच घेतला. ‘मोदी’ या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सुचले. तेव्हाच कळले आता, ‘शिमगा’ जवळ आलाय. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. उगाच ‘यमका’साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले’, असे शेलार यांनी राऊत यांना सुनावले.सूत्रांनी सांगितले की, मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यांना मंचावर जागा नसेल. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मंत्री असतील.शिवसेना दाखविणार काळे झेंडेनवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. निमंत्रितांमध्ये शिवसेनेचे खा. श्रीरंग बारणे, आ. मनोहर भोईर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. विमानतळाचे काम वेळेत सुरू व्हावे, यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. मात्र केवळ श्रेयासाठी भाजपाने शिवसेनेच्या खासदार व आमदारांना कार्यक्रमातून डावलल्याचे रायगड (उत्तर) जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्त मांडणार व्यथापनवेल व उरण तालुक्यातील सुमारे ९६ गावांमधील हजारो हेक्टर जमीन नवी मुंबई प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याच्या न्यायालयीन आदेशाकडे शासनाने व सिडकोने दुर्लक्ष केले आहे, असे प्रकल्प बाधित शेतकºयांचे वकील भारत नवाळे यांनी सांगितले. पंतप्रधानांकडे व्यथा मांडण्याची तयारी प्रकल्पग्रस्तांनी केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरे