Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेज प्रकरणी पंतप्रधानांसोबत चर्चा करणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 02:32 IST

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अथर्मंत्र्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.

मुंबई : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अथर्मंत्र्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.जेट एअरवेजचे वैमानिक, केबिन क्रू , इंजिनियर, ग्राऊंड स्टाफ, लोडर सिक्युरिटी यांच्या प्रतिनिधींसोबत भारतीय कामगार सेनेने ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबध्द असून त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांची चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. शपथविधी झाल्यानंतर तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भा.का.से.चे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांनी कर्मचाºयांसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती ठाकरे यांना दिली. बैठकीला भा.का.सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम, गोविंद राणे व जेटचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाकासे तर्फे केंद्रीय उप कामगार आयुक्तांशी पाठपुरावा करण्यात आला असून जेट एअरवेजच्या कर्मचाºयांचे विमानतळ प्रवेश पास रद्द करु नये यासाठी आदेश मिळवण्यात आला आहे. स्टेट बॅक आॅफ इंडिया, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय, जीव्हीके यांना पक्षकार करावे अशी भूमिका भाकासे ने मांडली होती. जेट एअरवेजच्या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होऊ असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. तर, जेटच्या कर्मचाºयांसाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे संजय कदम म्हणाले.