Join us  

शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे रमले बालमेळाव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:19 AM

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी वर्सोवा येथील चाचा नेहरू मैदानातील बालजल्लोष मेळाव्यात रमून गेले.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी वर्सोवा येथील चाचा नेहरू मैदानातील बालजल्लोष मेळाव्यात रमून गेले. विविध चित्रवाहिन्यांवर आपला ठसा उमटविणाºया लिटिल चॅम्पने सादर केलेल्या गाण्यांच्या मैफलीत ते रमून गेले. मिथिला माळी या बालिकेने सादर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताला त्यांनी जोरदार दाद दिली, त्याचबरोबर मंचावर बोलावून त्यांनी तिचा सत्कार केला. निमित्त होते मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा)आंबेरकर यांनी वर्सोवा मेट्रो स्थानकाजवळील चाचा नेहरू उद्यानात आयोजित बालजल्लोष मेळाव्याचे.वर्सोवा येथील मॉडेल टाऊन रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन आणि स्वप्नाक्षय मित्र मंडळाने १४वा बाल दिन महोत्सव आयोजित केला होता. बालजल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या फर्माइशीने गायक अमेय दाते यांनी ‘लागा चुनरी मे दाग’ हे गाणे सादर करून उपस्थितांची जोरदार दाद मिळवली. या भागात लहान मुलांसाठी खेळाचे मैदान नसताना २००३ साली या उद्यानाची निर्मिती करणारे कॉँग्रेसचे दिवंगत नेते व माजी खासदार सुनील दत्त यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी आंबेरकर यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाला उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर, आमदार व विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, राजू पेडणेकर, विष्णू कोरगावकर, शाखाप्रमुख अनिल राऊत, आयोजक संजीव कल्ले, मॉडेल टाऊन रेसिडन्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, उमा ढेरे, ममता गुप्ता यांच्यासह लहान मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना