Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे उद्या सपत्नीक गणपतीपुळेत

By admin | Updated: November 21, 2014 00:35 IST

ते तालुक्यातील मालगुंड या ‘निर्मल ग्रामपंचायती’ला यावेळी भेट देणार

गणपतीपुळे : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे शनिवार, दि. २२ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. ते तालुक्यातील मालगुंड या ‘निर्मल ग्रामपंचायती’ला यावेळी भेट देणार आहेत.त्यांचे मालगुंड व वाटद जिल्हा परिषद गटातील शिवसेनाप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मालगुंंड ग्रामपंचायत यांच्यातर्फे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी दिली.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख राजू साळवी, मालगुंडच्या सरपंच साधना साळवी, उपसरपंच प्रसाद पाटील, उपविभाग प्रमुख अनिकेत सुर्वे उपस्थित होते. दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे यांचे मालगुंड येथील खारभूमी मैदानाच्या हेलीपॅडवर आगमन होईल. ते स्वयंभू ‘श्रीं’चे सपत्नीक दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मालगुंड ग्रामपंचायतीला ते भेट देणार असून, तेथे स्वागत व सत्कार केला जाणार आहे.ठाकरे यांच्या स्वागतासाठी वाटद गटातील कार्यकर्त्यांकडून मोठमोठे बॅनर व होर्डिंग्ज लावणे, स्वागत कमानी उभारणे, मंडप उभारणे, मालगुंड हेलीपॅड परिसर सुशोभित करणे, मालगुंड ग्रामपंचायतीच्या आवार परिसराची स्वच्छता करणे आदी कामे करण्यात येत आहेत. (वार्ताहर)