Join us  

उदयनराजे भोसलेंचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:34 PM

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने  गेल्या सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने  गेल्या सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे.

मुंबई - भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन त्यांचे मानले आभार आहेत. उत्तरप्रदेशमधील मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव दिल्याबद्दल उदयनराजेंनी योगींना फोन केला. योगी आदित्यनाथ यांनी मुघल संग्रहालयाचे नाव बदलल्यानंतर, आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं ट्विट करुन सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने  गेल्या सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. योगी सरकारच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कौतुक केले आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक म्हणून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो, असे संभाजराजेंनी म्हटले होते. 

संभाजीराजे यांच्यानंतर आता उदयनराजे भोसले यांनीही फोन करुन योगी आदित्यनाथ यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. छत्रपतींच्या दोन्ही वंशजांनी योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, महाराष्ट्रातील जनतेनंही योगी सरकारच्या या निर्णयाचे समाधान व्यक्त करत स्वागत केले आहे.

दरम्यान, आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला होता. मुघल संग्रहालयाला योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे नाव दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली होती. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, 'आग्रामधील निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहे. जय हिंद जय भारत.'

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा हा योग्य मार्ग आहे. मुख्यमंत्री योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक संग्रहालयाचे नाव ठेवले आहे, तर काही लोक त्यांच्या वारशाचा दावा करणारे साधू, महिला, पत्रकार आणि दिग्गजांवर अत्याचार करतात, असे म्हणत राजकीय टोलेबाजीही केली होती. 

टॅग्स :उदयनराजे भोसलेयोगी आदित्यनाथछत्रपती शिवाजी महाराज