थोडक्यात तीन
By admin | Updated: March 23, 2017 17:16 IST
एटीव्हीएम मशिन बंद
थोडक्यात तीन
एटीव्हीएम मशिन बंदमुंबई : तिकीट खिडकीवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम मशिन सर्व रेल्वे स्थानकांवर बसवल्या आहेत. याचा वापर करा, असे आवाहन रेल्वेकडून नेहमी केले जाते. परंतु चिंचपोकळी स्थानकासह बर्याच रेल्वेस्थानकांवर बसवण्यात आलेली ही यंत्रे बंद असून, ती सुरू करण्यात यावीत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.अंधेरीत वाहतूककोंडीमुंबई : अंधेरी पश्चिम येथील जे.पी. मार्ग हा रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहने या मार्गावरून जातात. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. पालिकेने हा रस्ता रुंद करावा किंवा अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.शिवजयंती उत्साहातमुंबई : अंधेरी येथील गोविंदवाडी या ठिकाणी शिवशक्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. पारंपरिक वेषभूषेत मिरवणूक काढण्यात आली. चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धांमध्ये विजयी झालेल्यांना गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.