Join us
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात पाच

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

थोडक्यात पाच

थोडक्यात पाच

व्यंगचित्रकार कार्यशाळा
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि कला प्रबोधिनीतर्फे व्यंगचित्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हे वर्ग २७ डिसेंबर २०१५ पासून होणार असून प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि संजय मिस्त्री मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेत राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे काढण्यासाठी लागणारे तंत्र आणि मंत्र, त्याचप्रमाणे आकर्षक चित्रासाठीच्या खुब्या या सर्वांचे रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

फेरीवाल्यांचा त्रास
मुंबई : मध्य रेल्वेतील महिलांच्या डब्यात पुरुष विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांच्या डब्यात असणार्‍या पुरुष विक्रेत्यांची रेल्वेच्या डब्यात येण्यासाठी कडाक्याची भांडणे होतात. महिला प्रवासी भांडणे सोडवू शकत नाहीत. शिवाय त्यामुळे इतर टवाळखोर मुलांचेही फावते. महिला डब्यात प्रवास करायला ते कचरत नाही. महिलांच्या डब्यातील हा प्रकार रोखण्यासाठी पुरुष फेरीवाल्यांवर निर्बंधने घालावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

कचरा टाकू नये
मुंबई : भांडुप पश्चिम येथील बडवाईक रुग्णालयाजवळ मोठा नाला आहे. हा नाला वरचेवर साफ करण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून या नाल्यात पिशव्यांचा ढिग साचला आहे. येथे कचरा टाकू नये, असा फलक लावूनही या नाल्यात कचरा नागरीकांकडून टाकला जात आहे, अशी स्थानिकांची तक्रार आहे. या नाल्यात कचरा टाकणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

एटीएम असुरक्षित
मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर एटीएम आहेत. ही एटीएम मशीन रेल्वे स्थानकाजवळ जरी असली तरी या एटीएमकडे सहसा कोणाचेही लक्ष जात नाही. त्यामुळे ही एटीएम नजरेस दिसतील अशा टप्प्यात हलविण्यात यावीत. शिवाय सुरक्षा रक्षकही नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जनजागृती अभियान
मुंबई : नाका कामगार संघटनेकडून जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी हे अभियान विक्रोळी नाका क्रमांक ३, टागोर नगर येथे सकाळी ८ ते ९ या वेळेत होणार आहे. या अभियानाला अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.