थोडक्यात -
By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST
राव बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष
थोडक्यात -
राव बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्षमुंबई : बेस्ट वर्कर्स युनियनच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे. त्यामुळे युनियनचे नवे अध्यक्ष म्हणून आता राव संघटनेचा कारभार पाहणार आहेत. बेस्ट कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे राव यांनी सांगितले.................कामगारांच्या मुलांचा गौरवमुंबई : म्युनिसिपल मजदूर युनियनने कामगारांच्या मुलांसाठी आयोजित केलेला गुणगौरव समारंभ शनिवारी परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त अलका ससाणे आणि उपायुक्त किरण आचरेकर यांच्या हस्ते एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले....................