Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांची लॉजमधून सुटका

By admin | Updated: February 26, 2015 22:49 IST

भिवंडीच्या कोनगाव येथील ‘स्वागत लॉज’मध्ये शरीरविक्रयासाठी डांबून ठेवलेल्या दोन महिलांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी व्यापार

ठाणे : भिवंडीच्या कोनगाव येथील ‘स्वागत लॉज’मध्ये शरीरविक्रयासाठी डांबून ठेवलेल्या दोन महिलांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने सुटका केली आहे. त्यांच्याकडून अनैतिक प्रकार करून घेणारा लॉजचा मॅनेजर सुशांतकुमार दास आणि त्याचा साथीदार नामदेव राऊत यांना अटक केली आहे.कोनगावच्या या लॉजमध्ये महिलांकडून अनैतिक प्रकार करून घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी २४ फेब्रुवारीला रात्री या लॉजमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून खातरजमा केली. तेव्हा दास आणि राऊत हे संगनमताने पिडीत महिलांंना लॉजमध्ये बोलवून पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्रयाचा व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले.