Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार किलोमीटर्सचे रस्ते पादचाऱ्यांसाठी सुसह्य होणार; महापालिकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:36 IST

मोटार वाहतूकही सुरळीत होणार

मुंबई : मुंबईतील सुमारे दोन हजार किलोमीटर्सचे रस्ते पादचाऱ्यांना सुसह्य आणि सहज चालता यावे यासाठी महापालिकेमार्फत मोकळे करण्यात येणार आहेत. यामुळे मोटार वाहतूकही सुरळीत होईल, अशा गोष्टींचा समावेश असणार आहे. यात पदपथ खुले करणे, त्यांची रुंदी वाढविणे, दुभाजकांची आणि जोडरस्त्यांसह व्यापारी पेठांतील रस्त्यांचे सौंदर्यीकरण, यासह बसथांबे, रस्ते यांच्या रचनेत बदल ते सुविधापूर्ण व्हावेत अशा संकल्पना आहेत.मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत असे प्रयत्न आहेत. यासाठी महापालिकेने ब्लुमर्ग फिलॉन्थापीस्ट आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या मदतीने रस्ते पुनर्रचनेसाठी एक स्पर्धा घेतली. त्यातून पाच रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले. या आराखड्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली. मुंबई स्ट्रीट लॅब प्रदर्शनाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.स्पर्धेत यशस्वी संस्था आणि संबंधित रस्त्यांमध्ये विक्रोळी पार्कसाईट रोड क्रमांक १७ - वांद्रे कलेक्टिव्ह रिसर्च अ‍ॅण्ड डिझाईन फाउंडेशन, मौलाना शौकत अली रोड - मेड(ई) इन मुंबई, ई नेपियन सी रोड - स्टुडिओ पोमग्रेनेट, राजाराम मोहन रॉय रोड - स्टुडिओ इनफिल अ‍ॅण्ड डिझाईनशाला कोल्याबरोटीव्ही, एस.व्ही. रोड - प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्सचा समावेश आहे.७० हजार चौरस फूट जागा झाली मोकळी‘मुंबई स्ट्रीट लॅब’ या स्पर्धेत रस्त्यांची संरचना-संकल्पनेशी निगडित संरचनाकार-विशारदांनी सहभाग घेतला. यात ५२ संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यातून १५ संघांची निवड करण्यात आली. या संघांना शहरातील पाच रस्त्यांच्या पुनर्रचनेसाठी संकल्पना सादर करण्याचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम देण्यात आले. या स्पर्धेतून हे रस्ते पादचाºयांसाठी खुले करण्यात आले. यात केवळ पाच रस्त्यांवरील सुमारे ७० हजार चौरस फूट जागा कोणतेही मोठे फेरबदल न करता मोकळी करण्यात यश आल्याची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका