Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वे मार्गावर दोन चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:03 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये प्रवाशांच्या किमती वस्तू, रोकड, मोबाइल लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना वांद्रे रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये प्रवाशांच्या किमती वस्तू, रोकड, मोबाइल लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना वांद्रे रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. श्रावणकुमार रघुराम पांडे (२३, रा. नालासोपारा) आणि अशपाक सलीम शेख (३६, रा. सांंताक्रुझ) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी सांगितले.लोकलमध्ये महिलांवरील अत्याचार, वाढत्या चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे पोलिसांना आपापल्या हद्दीतील रेल्वे स्थानकावर गस्त घालण्याची सूचना वारंवार दिली जाते. त्यानुसार, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्येतील सहायक फौजदार के. एस. लोंढे हे सहकाºयांसमवेत स्थानकात गस्त घालीत असताना, त्यांना श्रावणकुमार पांडे संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. झडती घेतली असता, त्याच्याकडे प्रवाशाचे चोरलेले पाकीट मिळाले. त्यात आधार, पॅन कार्ड, तसेच ८०० रुपयांची रोकड होती.दुसरीकडे, उपनिरीक्षक डी.एस. सौन्ना यांना अशपाक शेख याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याची झडती घेतली. या वेळी त्याच्याकडे चोरी केलेला मोबाइल सापडला. त्या दोघांनाही ताब्यात घेत अधिक तपास सुरू असल्याची माहिती व. पो. नि. जाधव यांनी दिली.

टॅग्स :अटक