Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दोन विद्यार्थ्यांची आशियाई परिषदेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 04:02 IST

हाँगकाँग येथे होणाऱ्या हॉर्वर्ड आशिया परिषदेसाठी येथील प्रवीण गांधी विधि महाविद्यालयाच्या शार्दुल कुलकर्णी आणि आदित्य मनुबरवाला यांची निवड झाली आहे.

मुंबई : हाँगकाँग येथे होणाऱ्या हॉर्वर्ड आशिया परिषदेसाठी येथील प्रवीण गांधी विधि महाविद्यालयाच्या शार्दुल कुलकर्णी आणि आदित्य मनुबरवाला यांची निवड झाली आहे. हॉर्वर्ड विद्यापीठातर्फे १९ ते २३ आॅगस्टदरम्यान आशियाई आंतरराष्ट्रीय संबधांबाबत ही परिषद होत आहे.आशियाई देशांतील सामाजिक, आर्थिक विषयासंबंधी हॉर्वर्ड विद्यापीठाने ७५ देशांतील प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व शार्दुल आणि आदित्य करणार आहेत. त्यांना ‘चायनीज जनरल चेंबर आॅफ कॉमर्स’ची शिष्यवृत्ती मिळणार आहे. परिषदेत नोबेल पुरस्कार विजेते राबाक्कूल करमान, हाँगकाँगचे माजी अर्थसचिव अ‍ॅथनी लेयुंग आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. (प्रतिनिधी)