Join us  

शब-ए-बारातसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून रात्रकालीन दोन विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:38 AM

शब-ए-बारात या मुस्लीम बांधवांच्या सणाच्या दिनी पश्चिम रेल्वे मार्गावरून विशेष दोन लोकल चालविण्यात येणार आहेत.

मुंबई : शब-ए-बारात या मुस्लीम बांधवांच्या सणाच्या दिनी पश्चिम रेल्वे मार्गावरून विशेष दोन लोकल चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या मार्गावरून विशेष लोकल २१ एप्रिलच्या मध्यरात्री चालविण्यात येणारआहेत.रविवारी पहिली विशेष लोकल विरार येथून १ वाजून ४२ मिनिटांनी रवाना होणार असून ही लोकल चर्चगेट स्थानकावर ३ वाजून २२ मिनिटांनी पोहोचेल. तर चर्चगेट येथून दुसरी विशेष लोकल मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ही लोकल विरार स्थानकावर पहाटे ४ वाजून १५ मिनिटांना पोहोचेल. या दोन्ही विशेष लोकल धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार असून दोन्ही विशेष लोकलना सर्व स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.चर्चगेटहून सुटणारी मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांची लोकल मरिन लाइन्स स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ३८ मिनिटांना, मुंबई सेंट्रल स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ४७ मिनिटांना, दादर स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांना, माहिम स्थानकावर पहाटे ३ वाजून ०४ मिनिटांना, वांद्रे स्थानकावर पहाटे ३ वाजून ८ मिनिटांना पोहोचेल. इतर प्रत्येक स्थानकावर लोकल थांबा घेत विरारपर्यंत चालविण्यात येणार आहे.विरारहून सुटणारी मध्यरात्री १ वाजून ४२ मिनिटांची वांद्रे स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ४८ मिनिटांना, माहिम स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांना, दादर स्थानकावर मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांना, मुंबई सेंट्रल स्थानकावर पहाटे ३ वाजून ११ मिनिटांना, मरिन लाइन्स स्थानकावर पहाटे ३ वाजून १९ मिनिटांना, चर्चगेट स्थानकावर पहाटे ३ वाजून २२ मिनिटांना लोकल पोहोचेल.इतर प्रत्येक स्थानकावर लोकल थांबा घेत विरारपर्यंत चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :लोकल