Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटूनही ’त्या’ दोन बहिणी बेपत्ता

By admin | Updated: September 25, 2016 02:41 IST

गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा शोध घेण्यास धारावी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. यामध्ये एक १७ वर्षीय आणि १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

मुंबई : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा शोध घेण्यास धारावी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. यामध्ये एक १७ वर्षीय आणि १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू आहे. धारावी परिसरात १७ वर्षीय प्रिया आणि १५ वर्षी रिटा या दोघी १० आॅगस्ट रोजी काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. प्राथमिक तपासात त्या गुजरातमध्ये असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)