Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन थोडक्यात बातम्या....

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

रेल्वे जिन्याची दुरवस्था

रेल्वे जिन्याची दुरवस्था
मुंबई: माटुंगा रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडून उतरण्यासाठी असलेल्या जिन्यांच्या पायर्‍या पूर्णत: निघाल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
.............
चुकीच्या उद्घोषणेमुळे गोंधळ
मुंबई: माटुंगा रेल्वे स्थानकातून सायंकाळी ४.३० वाजता सुटलेल्या सीएसटी लोकलमध्ये दादर स्थानक येत असताना अचानक विद्याविहार स्थानकाची उद्घोषणा करण्यात आल्याने प्रवाशी वर्गात गोंधळ उडाल्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे चुकीची लोकल पकडल्याची भीतीने काही नवख्या प्रवाशांना भेडसावू लागली. महिला डब्ब्यातील महिलांनी उद्घोषणा ऐकताच दरवाजाच्या दिशेने धाव घेतली.
...................