Join us

दोन छोट्या बातम्या....संक्षिप्त...

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

दोन छोट्या बातम्या....संक्षिप्त...

दोन छोट्या बातम्या....संक्षिप्त...

संसदीय समितीवर
आठवले यांची नियुक्ती
मंुबई - अनुसूचित जाती, जमातीच्या कल्याणासाठी असलेल्या संसदीय समितीवर सदस्यपदी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यपदासाठी संसदेत मतदान घेण्यात येते. दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या समितीवर निवड झाल्याने सर्वपक्षीय खासदारांनी आठवले यांचे अभिनंदन केले आहे.
.......................................................
बहुजनांच्या हितासाठीच
संघर्ष सुरु -आठवले
मंुबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचे मावळे एकत्र करुन स्वराज्याचा लढा उभारला. तोच बहुजन कल्याणाचा विचार घेऊन महात्मा फुले आणि संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा लढा उभारला. हाच वारसा घेऊन रिपब्लिकन पक्षाचा संघर्ष सुरु असल्याचे खा. रामदास आठवले म्हटले आहे. एका कार्यक्रमात आठवलेंनी या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी रिपाइंचे मराठा आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब मिरजे, सिद्राम ओव्हाळ, सुरेश बारशिंग, अर्जुन डांगळे, गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, महेश खरे आदी उपस्थित होते.