Join us
Daily Top 2Weekly Top 5

खदानीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

By admin | Updated: September 6, 2014 03:12 IST

तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण जमिनीत खोदलेल्या खदानीत पोहोण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला़

भिवंडी : तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण जमिनीत खोदलेल्या खदानीत पोहोण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला़ विवेक राजू अवधूत (14) व वामशीद रमेश वानम (11) अशी त्यांची नावे असून, ते आपल्या मित्रंसोबत गुरुवारी दुपारी कालवार गावातील दगडाच्या खदानीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात पोहोण्यास गेले होते. खोली न समजल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे शहरातील भंडारी कम्पाउंडमध्ये राहणारे आहेत. त्यापैकी विवेक अवधूत हा पीटीआय शाळेत नववीत शिकत होता, तर वामशीद वानम हा नारपोली येथील सरस्वती स्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. त्यांचे आईवडील यंत्रमाग कामगार आहेत. (प्रतिनिधी)
 
आयआयटीत विद्याथ्र्याचा मृत्यू 
मुंबई : इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग करणा:या अनिकेत भोरे या विद्याथ्र्याचा पवईच्या आयआयटीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. काल रात्री ही घटना घडली. -वृत्त/2