Join us

अपघातात श्वानासह दोन पिल्ले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

मुंबई : टेम्पो आणि हातगाडीच्या धडकेमुळे श्वानांच्या दोन पिल्लांसह त्यांची आई जखमी झाल्याची घटना चिराबझारमध्ये साेमवारी (दि. ११) घडली. ...

मुंबई : टेम्पो आणि हातगाडीच्या धडकेमुळे श्वानांच्या दोन पिल्लांसह त्यांची आई जखमी झाल्याची घटना चिराबझारमध्ये साेमवारी (दि. ११) घडली. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

............................................

कर्जवसुलीसाठी धमक्या; निवृत्त एसीपीची तक्रार

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात थकीत कर्ज सुलीसाठी बँकेचे दलाल असभ्य वर्तन, शिवीगाळ करीत असल्याची तक्रार निवृत्त एसीपीने खार पोलिसांकडे नुकतीच दाखल केली आहे. त्यानुसार खार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

..............................................................

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत पवईतील रहिवासी असलेल्या दीपाली धसाडे (वय २१) या तरुणीच्या दुचाकीचा अपघात हाेऊन तिचा जागीच मृत्यू झाला. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात रविवारी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.

..........................................

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकड़ून मद्यप्याला चोप

मुंबई : बोरिवली येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या मद्यप्याला रविवारी कर्मचाऱ्यांनी चोप दिला. याचा व्हिडीओ सोमवारी (दि. ११) प्रसारित झाला. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

..........................................

मारहाण करून पैशांची बॅग पळवली

मुंबई : मालाडचे रहिवासी असलेले २९ वर्षीय तक्रारदार कांदिवली येथून हिंदुस्थान नाक्याकडे जात असताना रविवारी चार अनोऴखी इसमांनी त्यांना अडवून शिवीगाऴ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील सहा लाख तीन हजारांची राेकड असलेली पैशांची बॅग पळविली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.......................................