Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॅनेजरला लुबाडणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:24 IST

आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री करणा-या एका व्यवस्थापकाला लुटून, ९ लाख ५० हजारांची रोकड लंपास करणा-या दोघांना, अखेर पवई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

मुंबई : आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री करणा-या एका व्यवस्थापकाला लुटून, ९ लाख ५० हजारांची रोकड लंपास करणा-या दोघांना, अखेर पवई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. शिवकुमार प्रताप सिंग (२३) व रहमत मोहम्मद अली (२१, दोघे रा. दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.हर्बल उत्पादनाची विक्री करणाºया पवईतील दुकानात दोघा तरुणांनी शिरून, व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून ९ लाख ५० हजारांची रोकड लुटली होती. त्यांनी चेहºयावर कापड लावल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांच्या चेहरा ओळखता आला नव्हता. मात्र, केवळ वर्णनाच्या आधारे वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे, उपनिरीक्षक महामुनी यांच्या पथकाने त्यांना दिल्लीतून अटक केली.