मुंबई : गेल्या दीड महिन्यात मुंबईत लेप्टोचा पाचवा बळी गेला आहे. वरळी येथील १७ वर्षीय मुलाचा १३ जुलै रोजी लेप्टोने मृत्यू झाला. मागील १५ दिवसांत शहरात लेप्टोचे १९ रुग्ण आढळले आहेत. शिवाय, एका खासगी रुग्णालयातही लेप्टोमुळे एका ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र पालिकेच्या अहवालात त्याची नोंद अजून झालेली नाही. जून महिन्यात लेप्टोने तीन जणांचा मृत्यू झाला होता. वरळी येथील ज्या १७ वर्षीय मुलाचा लेप्टोने बळी गेला तो मुलगा पावसाच्या पाण्यात भिजला होता. त्यानंतर आजारी पडल्यावर तिसऱ्या दिवशी त्याने डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्याला सात दिवस ताप होता, उलटीतूनही रक्त पडत असताना त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची तब्येत बिघडल्याने अखेर १२ जुलै रोजी त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दुसºया दिवशी त्याचा मृत्यू झाला.
लेप्टोचे आणखी दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 06:03 IST