Join us
Daily Top 2Weekly Top 5

टास्क फोर्समध्ये मुंबईचे दोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:07 IST

डॉ. राहुल पंडितडॉ. राहुल पंडित हे दोन दशकांहून अधिक काळ अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ...

डॉ. राहुल पंडित

डॉ. राहुल पंडित हे दोन दशकांहून अधिक काळ अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन आणि अतिदक्षता विभागाचे संचालक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जॉइंट फॅकल्टी ऑफ इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे ते उपाध्यक्षही आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाकाळात राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डॉ. झरीर उडवाडिया

डॉ. झरीर उडवाडिया हे वरिष्ठ छातीविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. उडवाडिया हे एफसीसीपी (अमेरिका), एफआरसीपी (लंडन) आणि हिंदुजा रुग्णालयांशी संलग्न आहेत. क्षयरोग, न्यूमोनिया, अस्थमा, ब्राँकॉस्कॉपी, झोपेचे विकार, सार्कोइडोसिस या वैद्यकीय आजार शाखेत निष्णात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १७० हून अधिक वैद्यकीय संशोधन जर्नलमध्ये त्यांचे अहवाल प्रकाशित झाले आहेत.