Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचे तांबे लुटणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 05:05 IST

तळोजा येथील कॉपर इंडिया कंपनीचे दोन कोटींचे तांबे लुटणाऱ्या दोन मुख्य सूत्रधारांना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या.

मुंबई : तळोजा येथील कॉपर इंडिया कंपनीचे दोन कोटींचे तांबे लुटणाऱ्या दोन मुख्य सूत्रधारांना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या. मोहसीन अशरफ बलोच आणि वशीम शेख अशी दोघांची नावे असून त्यांच्याकडून गुजरातमध्ये दडवून ठेवलेले दोन कोटींचे तांबे जप्त केले.गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने वाहन चोरीप्रकरणी हजरतअली खान, अयुबअली शेख उर्फ गुड्डू यांना अटक करत ८ वाहने जप्त केली. चौकशीत मुख्य सूत्रधार वशीम, मोहसीनचे नाव समोर आली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली.