Join us

महाडजवळ कार अपघातात दोन ठार

By admin | Updated: July 25, 2014 23:51 IST

म्हाप्रळ भोर मार्गावर भरधाव इको कारने दोन दुचाकींसह एका पादचा:याला ठोकरून कारचालकाने पलायन केले.

महाड : म्हाप्रळ भोर मार्गावर भरधाव इको कारने दोन दुचाकींसह एका पादचा:याला ठोकरून कारचालकाने पलायन केले. काल रात्री 8.3क् च्या सुमारास झालेल्या या तिहेरी अपघातात एका दुचाकी स्वारासह पादचा:याचाही मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. एमआयडीसी पोलीस या अपघातग्रस्त कारचालकाचा शोध घेत आहेत.
म्हाप्रळकडून भोरकडे जाणारी (एमएच क्8 आर 7458) इको कार भरधाव वेगाने जात असताना या कारने राजेवाडी फाटय़ावर बशीर युसूफ गिरे (48, रा. कोंडीवते) या दुचाकीस्वाराला ठोकरून त्याला जखमी केले. त्यानंतर कार न थांबवता तशीच पुढे जात असताना भोराव येथे राजेश शिवराम सोनावणो (36, रा. भोराव) या पादचा:याला ठोकरले. यात सोनावणो यांचा जागीच मृत्यू झाला तर पुढे वरंध गावाजवळ समोरून येणा:या दुचाकीलाही या कारने धडक दिली. यात कृष्णा सुभाष महाडकर (31, रा. वरंध, मधली आळी) हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबईत नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांत या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)