Join us

मोबाईल चोरीप्रकरणी दोन अल्पवयीनांना अटक

By admin | Updated: December 21, 2014 23:32 IST

सातपाटीच्या एस.टी. स्टॉपलगत असेलेल्या मोबाईल दुकानाचे शटर फोडून त्यातील हजारो रुपयांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह एका १८ वर्षीय तरुणास अटक

पालघर : सातपाटीच्या एस.टी. स्टॉपलगत असेलेल्या मोबाईल दुकानाचे शटर फोडून त्यातील हजारो रुपयांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह एका १८ वर्षीय तरुणास अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.२७ नोव्हेंबरला सातपाटीच्या एसटी स्टॉपलगतच्या सॉ मिलजवळील नॅशनल कम्युनिकेशन या मोबाईल च्या दुकानाचे शटर फोडून चोरट्याने १४ मोबाईल चोरल्याची तक्रार दुकानाचे मालक वसंत गुप्ता यांनी पोलिसांकडे नोंदविली होती. तर मनसे अध्यक्ष रितेश पागधरे यांनीही गावात होणाऱ्या चोरीबाबतचा तपास करावा म्हणून सातपाटी सागरी पोलिसांकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सातपाटीच्या पिराबंदर भागातील तीन तरुणांना अटक केली. त्यांनी आपण चोरलेले मोबाईल एका पडीक मच्छिमारी बोटीत लपवून नंतर मित्रांमध्ये वाटप केले होते,अशी कबुली त्यांनी दिली आहे.दुकानदाराचा राग आल्याने आपण त्याला धडा शिकविण्याच्या हेतूने चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी दोन मुले अल्पवयीन असल्याने त्याचा न्यायालयाने जामीन मंजूर केला असून मुख्य आरोपीला पालघर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिल्याची माहिती सागरी पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)