Join us

वाशीत छताचे प्लास्टर निखळल्याने दोघे जखमी

By admin | Updated: August 5, 2014 00:08 IST

सिडकोच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची पडझड सुरूच आहे. आज वाशी येथील एका इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर निखळले.

नवी मुंबई: सिडकोच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची पडझड सुरूच आहे. आज वाशी येथील एका इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर निखळले. या अपघातात घरातील पती व पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
वाशी सेक्टर 1 येथील बी-14 या इमारतीच्या दुस:या मजल्यावर त्यागराजन पिल्ले व त्यांच्या पत्नी राहतात. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते झोपेत असताना अचानक छताच्या प्लास्टरचा एक मोठा भाग निखळून त्यांच्या अंगावर पडला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेषत: त्यागराजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार समजताच शेजारच्यंनी दोघा पती पत्नीला महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच आमदार संदीप नाईक व स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर भरत नखाते यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर रूग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. 
महापालिका आयुक्त ए.एल.ज:हाड यांनीही हॉस्पिटलमध्ये जावून जखमींची चौकशी केली.  अशाप्रकारचे स्लॅब व प्लास्टर निखळण्याच्या घटना या वसाहतीत आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मनसेचे वाशी विभागाचे माजी अध्यक्ष आनंद चौगुले यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. 
या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. सुदैवाने आतार्पयत अशा घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एखादय़ाचा जीव गेल्यानंतरच सिडको व महापालिकेला जाग येणार आहे का, असा सवाल चौगुले यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)