Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे किलो चांदी जप्त

By admin | Updated: June 16, 2016 03:12 IST

मुंबई पनवेल मार्गावरील नाक्यावर जकात चुकवून आणलेली दोनशे किलो चांदी पालिकेच्या दक्षता विभागाने आज जप्त केली़ त्यामुळे चांदीवर एक टक्का जकात वाचविणाऱ्या मालकाला तब्बल

मुंबई: मुंबई पनवेल मार्गावरील नाक्यावर जकात चुकवून आणलेली दोनशे किलो चांदी पालिकेच्या दक्षता विभागाने आज जप्त केली़ त्यामुळे चांदीवर एक टक्का जकात वाचविणाऱ्या मालकाला तब्बल दहापट दंड भरावा लागणार आहे़पनवेल मार्गावरील जकात नाक्यावरून एक गाडी जकात चुकवून मुंबईत दाखल होत असल्याची खबर पालिकेच्या दक्षता विभागाला मिळाली होती़ त्यानुसार, या गाडीचा पाठलाग करून ती फ्री वे जवळ वाडी बंदर येथे पकडण्यात आली. या चांदीची किंमत ७० लाख रुपये आहे़ पालिका चांदीवर १ टक्का जकात आकारते़ म्हणजे ७० हजार रुपये जकात संबंधित मालकाला भरावा लागणार होता़ जकात चुकविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सात लाख रुपये भरावे लागतील़ (प्रतिनिधी)