Join us

दोन तासात १५ घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

By admin | Updated: May 15, 2016 16:21 IST

कांजुरमार्ग पाठोपाठ भांडुप शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीमधील घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ : कांजुरमार्ग पाठोपाठ भांडुप शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीमधील घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आली.
अवघ्या दोन तासात १५ घरे फोडली असून लाखोंचा ऐवज चोरांनी लंपास कोला आहे, घरातील महिला बाहेर गेल्यानंतर ही चोरीची घटना घडली आहे. यासंबधीत चार संशयितांचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. चोरट्यांनी अगदी शिताफिने घरावर नजर ठेवून चोऱ्या केल्या आहेत. भरदिवसा ही चोरीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.