Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नायर’च्या दोन डॉक्टरांना मारहाण

By admin | Updated: June 5, 2016 00:46 IST

नायर रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तेथील दोन डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ६ नातेवाईकांना

मुंबई : नायर रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तेथील दोन डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ६ नातेवाईकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये मकिना सदरेआलम अन्सारी (५०) यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. त्यातच या महिलेचा मृत़्यू झाला. त्याच दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप करत गोंधळ घातला. यामध्ये निवासी डॉक्टर समीर भागवत आणि डॉ. सिध्दार्थ हरिंद्रनाथ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका सुरक्षा रक्षकाने याची माहिती वरिष्ठांना दिली. (प्रतिनिधी)