Join us  

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 12:11 PM

मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान पाच जण बुडाल्याची घटना समोर आली होती.

मुंबई : गुरुवारी (6 जुलै) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान पाच जण बुडाल्याची घटना समोर आली होती. यामधील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर यामध्ये तिघांचा बूडून मृत्यू झाला आहे. फरदिन सौदागर, सोहेल शकील खान आणि  नझीर गाझी या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शोध घेत आहेत. 

अंधेरी पश्चिम येथील डी. एन, नगरमध्ये डोंगरावर राहणारे फरदिन सौदागर (वय 17), सोहेल शकील खान (वय -17), फैसल शेख (वय 17), नाझीर गाझी (वय - 17) व वसीम सलीम खान (वय - 22) हे तरुण चौपाटीवर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, समुद्राला भरती असल्याने ते पाचही जण बुडाले. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या शोधकार्यानंतर  वसीम खान या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर तिघांचे मृतदेह सापडले असून एका तरुणाचा शोध सुरु आहे. 

टॅग्स :मुंबई