Join us

दोन डीसीपी वादात?

By admin | Updated: May 31, 2015 02:11 IST

एका वरिष्ठ निरीक्षकासह चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना गजाआड केल्यानंतर आता या प्रकरणात थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे पुढे येऊ लागली आहेत.

ड्रग प्रकरण : ५ जणांना ४ जूनपर्यंत कोठडीमुंबई : ड्रगमाफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकर प्रकरण मुंबई पोलिसांच्या चांगलेच मानगुटीवर बसले आहे. काल गुन्हे शाखेने बेबीला सर्वतोपरी सहकार्य केल्याच्या गुन्ह्यात एका वरिष्ठ निरीक्षकासह चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना गजाआड केल्यानंतर आता या प्रकरणात थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे पुढे येऊ लागली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी किमान दोन उपायुक्तांची चौकशी होऊ शकेल.बेबीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती तपास यंत्रणांच्या हाती लागू नये, तिला अटक होऊ नये यासाठी धडपड करण्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी गुन्हे शाखेने अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गोखले, निलंबित पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, अंमलीपदार्थविरोधी पथकाचे फौजदार सुधाकर सारंग, खंडणीविरोधी पथकाचे सहायक फौजदार ज्योतीराम माने आणि विशेष शाखेचे शिपाई यशवंत पार्टे यांना गजाआड केले. या सर्वांना दंडाधिकारी न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले.बेबी पाटणकर फरार असताना हे पाचही आरोपी तिच्या संपर्कात होते. पोलीस अधिकाऱ्यांपैकी बेबीचे अखेरचे बोलणे गोखलेंशी झाले. त्यानंतर बेबीने तो मोबाइल क्रमांक बंद केला. नवी सिमकार्ड्स आणि फोन वापरत तिने सुमारे दीड महिना गुन्हे शाखेला गुंगारा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीने गोखलेंकडे शरणागती पत्करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पुढे काही हालचाल होणार इतक्यात बेबीने तो फोन बंद केला. आज न्यायालयात हजर केल्यानंतर गोखले यांनी बेबीबाबत अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांना आपण तात्काळ माहिती दिली होती. मात्र त्यांच्याकडून पुढील आदेश मिळाले नाहीत, असा दावा केला. तर बेबीबाबतची माहिती गोखले यांनी तात्काळ नव्हे तर चार दिवसांनी कळविल्याचा प्रतिदावा करण्यात आला. प्रियकर आणि धंद्यातील साथीदार धर्मराज काळोखेला पकडून देण्याचा कट बेबीने आखला होता. त्यासाठी तिने गौतम गायकवाड, यशवंत पार्टे यांना हाताशी धरले होते. या दोघांनी बेबीच्या इशाऱ्यावरून काळाखेच्या खंडाळा येथील गावी ११० किलो एमडीचा साठा असल्याची माहिती गोखलेंना दिली होती. ही माहितीही गोखलेंनी आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली होती. मात्र गायकवाड व पार्टे यांच्या माहितीत वरिष्ठांना तितके तथ्य वाटले नाही. अखेर या दोघांनी रफीक बंब नावाच्या खबऱ्यामार्फत ही माहिती सातारा पोलिसांना पुरवली. पुढे सातारा पोलिसांनी काळोखेला अटक केली. त्याच्या चौकशीत बेबीचे नाव पुढे येताच गायकवाड, पार्टे यांनी सातारा पोलिसांशी संपर्क तोडला.च्काळोखेच्या पत्नीने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत स्वत:चा पती (काळोखे) आणि बेबीचे बिंग फोडले होते. दोघे ड्रग्ज विकतात, अशी तक्रार तिने केली होती. मात्र ही तक्रार कोणीही गांभीर्याने घेतली नाही. च्यात गुन्हे शाखेसोबत दक्षिण मुंबईतील एका उपायुक्ताचेही नाव पुढे आल्याची माहिती मिळते. त्यामुळे माहिती असूनही कारवाई का केली नाही, असा सवाल या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला जाऊ शकतो, असे समजते.