मुंबई : युती आणि आघाडी नसल्यामुळे या वर्षी मुंबई महापालिकेतील तब्बल 20 नगरसेवकांना विधानसभेचे तिकीट मिळाले
आहे. 2क्12 च्या पालिका निवडणुकीत महिला आरक्षणामुळे घरी बसावे लागलेल्या माजी नगरसेवकांनाही लॉटरी लागली आह़े त्यामुळे या वर्षीची विधानसभा निवडणूक अटीतटीची व चुरशी होणार आह़े
नगरसेवक ही पहिली राजकीय पायरी चढल्यानंतर आमदारकीची स्वप्ने अनेकांना पडतात़ मात्र यापैकी फारच कमी इच्छुक नगरसेवक यशस्वी ठरत असतात़ परंतु दावेदार अनेक असले तरी मित्रपक्षासाठी जागा सोडावी लागत असल्याने इच्छुकांचा हिरमोड होत होता़ दोघांच्या भांडणात तिस:याचा लाभ या म्हणीप्रमाणो युती व आघाडी तुटल्याचा फायदा नगरसेवकांना झाला आह़े
2क्क्9 विधानसभा निवडणुकीत आठ नगरसेवक मैदानात उतरले होत़े या वर्षी सर्वच राजकीय पक्षांतून तगडय़ा नगरसेवकांना संधी देण्यात आली आह़े भाजपाने 32 नगरसेवकांपैकी तब्बल सात जणांना उमेदवारी दिली आह़े तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी तगडय़ा दावेदार नगरसेवकांना रिंगणात उतरविले आह़े मित्रपक्षाविना पहिल्यांदाच लढण्यात येणा:या निवडणुकीत कोणाचे नशीब फळफळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े
शिवसेनेच्या डॉ़ राऊळ यांची बंडखोरी
सेनेचे आमदार विनोद घोसाळकरांविरुद्ध बंड पुकारणा:या डॉ़ शुभा राऊळ यांनी तिकिटासाठी दावा केला होता़ मात्र असुरक्षित नगरसेविकांना कारवाईचे आश्वासन देणा:या घोसाळकर यांना आमदारकीचे बक्षीस दिल़े यामुळे डॉ़ राऊळ यांनी कृष्णकुंज गाठले आणि मनसेतून तिकीट मिळवल़े त्या बंडखोरी करतील, अशी चिन्हे सहा महिन्यांपूर्वीच दिसली होती़ (प्रतिनिधी)
हे नगरसेवक शर्यतीत
4काँग्रेस - प्रवीण छेडा, शीतल म्हात्रे,
मनोज जामसूतकऱ
4राष्ट्रवादी - हरुन खान, राखी जाधव,
चंदन शर्मा़
4शिवसेना - सुनील प्रभू, अशोक पाटील,
अरुण दुधवडकऱ
4मनसे - दिलीप लांडे, ईश्वर तायडे,
भालचंद्र आंबुरे, डॉ़ शुभा राऊऴ
4भाजपा - मनोज कोटक, अमित साटम,
मनीषा चौधरी, डॉ़ राम बारोट, तमील सेल्वन, उज्जवला मोडक, महेश पारकऱ
माजी नगरसेवक
शिवसेना - सुनील शिंदे, राजुल पटेल, शशिकांत पाटकर, संजय पोतनीस, भाजपा - विद्या ठाकूर, राजेश शर्मा, मनसे - स्नेहल जाधव़