Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाडच्या समुद्रात दोन मुले बेपत्ता

By admin | Updated: June 16, 2015 03:37 IST

मालाड पश्चिमेकडील मालाड मार्वे रोडवरील समुद्रात दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, मतिन खान (१७) आणि राजेश आग्रे (१८) अशी त्यांची नावे आहेत.

मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालाड मार्वे रोडवरील समुद्रात दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, मतिन खान (१७) आणि राजेश आग्रे (१८) अशी त्यांची नावे आहेत.रविवारी रात्री ८:२२ वाजता अग्निशमन दलाकडून महापालिका नियंत्रण कक्षाला मालाडमधील समुद्रात ६ मुले बुडत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सतर्क झालेल्या यंत्रणेने सहापैकी चार मुलांना बाहेर काढले. तर उर्वरित दोन मुलांना रस्सी व गळाच्या मदतीने शोधण्याचे काम सुरू करण्यात आले.मुलांचा शोध लागत नसल्याच्या कारणात्सव नौदलाच्या पाणबुड्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत बुडलेल्या मुलांचा शोध लागत नव्हता. अखेर रात्रीपुरते काम थांबवून रविवारी सकाळी पुन्हा मुलांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु त्यांचा शोध लागला नाही. (प्रतिनिधी)