अलिबाग : येथील गोकुळेश्र्वर परिसरात दोन एसटी बसच्या अपघातात तीन गंभीर तर १३ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मुंबई-अलिबाग ही बस गोकुळश्र्वर येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आली असता मागून येणाऱ्या पनवेल-अलिबाग या बसच्या चालकाला तेथील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने ती थेट मुंबई-अलिबाग या बसवर आदळली. ही धडक एवढी गंभीर होती की या धडकेत मुंबई - अलिबाग बसचा चालक शिवाजी भोयर, कमळाबाई सकपाळ (अहमदाबाद) आणि जीवन भोईर (मोरखल) हे तिघे गंभीर जखमी, तर अन्य १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
दोन बसच्या अपघातात तीन गंभीर, १३ जखमी
By admin | Updated: November 16, 2014 23:15 IST