बोईसर : पूर्वेकडील खैरपाडा गावात राहणा:या बिपीन (27) व आतीष (26) धोडी या दोन सख्ख्या भावांचा गावाजवळील बेटेगाव नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत्यूबाबत मृतांचे मोठे भाऊ संजय यांनी संशय व्यक्त केला आहे.
15 ऑगस्टच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास हे दोन्ही भाऊ बोईसर येथील आठवडय़ाच्या बाजारात बॅग आणण्याकरिता जातो, असे सांगून गेले ते परतलेच नाहीत. रविवारी सकाळी 1क्च्या सुमारास प्रथम बिपीन याचा मृतदेह नाल्यात वाहत येत असताना दिसला, तर आतीष याचा मृतदेह ट्विन्स वर्ड शाळेजवळील नाल्यात संध्याकाळी आढळला. या दोघांचे मृतदेह कपडय़ावरून ओळखल्याचे नातेवाइकांनी सांगितले. (वार्ताहर)