मुंबई : वर्षभरापासून शहरात अनधिकृत वास्तव्य करणा:या दोन बांगलादेशी नागरिकांसह त्यांना बनावट पासपोर्ट तयार करून देणा:या एजंटला ओशिवरा पोलिसांनी गजाआड केले. या आरोपींकडून पोलिसांनी बनावट पासपोर्ट हस्तगत केले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
जोगेश्वरीतील बेहरामपाडा परिसरात गेल्या वर्षभरापासून दोन बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्य करीत असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवस ते राहत असलेल्या परिसरात पाळत ठेवली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या आरोपींच्या घरी छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी केली असता दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले. वर्षभरापूर्वी कोलकातामार्गे दोघेही मुंबईत दाखल झाल्याचे त्यांनी पोलिसांना
सांगितले. (प्रतिनिधी)