Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यातील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करणाऱ्या दोघा जणांना वडाळा पोलिसांनी गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करणाऱ्या दोघा जणांना वडाळा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अमित अजय कांबळी (वय २३) व तेजस संजय निकाळजे (१९, दोघे रा. आनंदवाडी, वडाळा) अशी त्यांची नावे असून, त्यांनी शैलेंद्र उर्फ शकी राजाराम गायकवाड (३१) याची २५ मे रोजी हत्या केली होती.

वडाळ्यातील आनंदवाडी परिसरात गायकवाडचा मृतदेह आढळला होता. त्याच्या तोंड, गळा व पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. घटनास्थळी कसलाही पुरावा नव्हता, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नव्हते. दहशतीमुळे नागरिकही काही माहिती देत नव्हते. त्यामुळे हल्लेखोराचा छडा लावणे बिकट झाले होते. मात्र वडाळ्याचे वरिष्ठ निरीक्षक शहाजी शिंदे, निरीक्षक मंगेश शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत कसून तपास करीत माहितीगाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांचा शोध घेतला. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील अन्य गुन्ह्यांची माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

............................