Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या लाचखोर स्टेशन संचालकासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:06 IST

सीबीआयची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मध्य रेल्वेतील एका ठेकेदाराकडे १० ...

सीबीआयची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मध्य रेल्वेतील एका ठेकेदाराकडे १० हजारांची लाच घेताना शनिवारी स्टेशन संचालकासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

जी. एस. जोशी व बाबू अशी त्यांची नावे असून, केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. जोशी हा मध्य रेल्वेतील स्टेशन डायरेक्टर आहे, तर दुसरा खासगी व्यक्ती त्याचा मध्यस्थ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जी. एस. जोशीने सीएसएमटीमध्ये काही वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याने त्याबाबत सीबीआयच्या एसीबी विभागात तक्रार दिली, त्यांनी रचलेल्या सापळ्यानुसार शनिवारी कार्यालयात रक्कम देण्याचे ठरले. जोशी हा मध्यस्थामार्फत रक्कम स्वीकारत असताना त्याला पकडले. दोघांच्या घराची झडती सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.