Join us

दिंडोशीत ५७ किलो गांजासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

दिंडोशीत ५७ किलो गांजासह दोघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडच्या दिंडाेशीतून जवळपास ५७ किलो गांजा हस्तगत करण्यात ...

दिंडोशीत ५७ किलो गांजासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडच्या दिंडाेशीतून जवळपास ५७ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दोघांच्या अटक केली.

तबारक हमीद सय्यद (२२) आणि मिस्तफिजुर शेख (२३) अशी अटक आराेपींची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना मालाड पूर्वच्या खडकपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा या अमली पदार्थाचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ.डी.एस. स्वामी आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक फड आणि पथकाने बुधवारी एका गॅरेजवर धाड टाकून शेख व सय्यद यांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे ५७ किलो गांजा सापडला. याची किंमत ५ लाख ७० हजार रुपये असून, तो त्यांनी मुंबई, तसेच उपनगरात विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. त्यानुसार, त्यांच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

-------------------