Join us
Daily Top 2Weekly Top 5

ॲन्टॉप हिल येथे अडीच लाखांची घरफोडी

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

ॲन्टॉप हिल येथे अडीच लाखांची घरफोडी

ॲन्टॉप हिल येथे अडीच लाखांची घरफोडी

मुंबई: घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांची घरफोडी केल्याची घटना शनिवारी ँॲन्टॉपहिल येथे घडली. येथील मिस्त्री दर्गा रोड परिसरात राहणारे रियाझउद्दीन खान हे शुक्रवारी त्याच्या कुटुंबीयांसह एका नातेवाईकाकडे गेेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बनावट चावीने चोरट्यांनी कपाटामधून अडीच लाख रुपये लंपास केले. खान यांना मुंब्रा परिसरात नवीन घर खरेदी करायचे होते. यासाठी त्यांनी साडेसात लाखांची रक्कम जमा केली होती. मात्र, काल सायंकाळी त्यांनी ही रक्कम मोजण्यासाठी बाहेर काढली असता त्यात अडीच लाख कमी मिळून आले. यासंदर्भात त्यांनी घरातील सगळ्यांकडे विचारपूस केली. मात्र, कोणीच यातील पैसे घेतले नसल्याने त्यांनी याबाबत ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घरातील इतर वस्तू जागेवरच असताना केवळ अडीच लाख रुपयेच गायब झाल्याने ही चोरी ओळखीच्याच इसमाने केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी शोध देखील सुरु केला आहे. (प्रतिनिधी)