Join us

टॅब प्रशिक्षणात महासभेत दोन तास वाया

By admin | Updated: January 8, 2015 00:41 IST

महापालिकेने पेपरलेस कामकाज करण्यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये नगरसेवकांना टॅबचे वितरण केले.

नवी मुंबई : महापालिकेने पेपरलेस कामकाज करण्यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये नगरसेवकांना टॅबचे वितरण केले. परंतु टॅबवर पालिकेच्या विषयपत्रिका कशा पहायच्या याविषयी प्रशिक्षण दिले नसल्यामुळे त्याचा वापर होत नव्हता. पाच महिन्यांनंतर बुधवारी प्रशासनाने महासभेचा दोन तासांचा वेळ फुकट घालवून नगसेवकांसाठी टॅब प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने ई - गव्हर्नस प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेपरलेस कामकाज करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सर्व नगरसेवकांना टॅबचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आॅगस्टमध्ये सर्वांना टॅब देण्यात आले. टॅबवर महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, प्रभाग समिती, विशेष समित्यांची विषयपत्रिका, इतिवृत्त व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार होती. यासाठी खास सॉफ्टवेअर तयार केले होते. प्रत्येक सभेच्या विषयपत्रिका सर्व नगरसेवकांपर्यंत पोहचविणे हे खर्चिक व वेळखाऊ असल्याने ही उपाययोजना केली होती. परंतु टॅबचा उपयोग कसा करायचा याची माहितीच देण्यात आली नव्हती. यामुळे नगरसेवकांकडून टॅबचा वापर होत नव्हता. टॅबवरील खर्च फुकट गेल्याची टीका होवू लागल्यामुळे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सर्वसाधारण सभेमध्ये विकास कामांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. शहरातील समस्यांवर चर्चा होते. सभेचा वेळ फुकट घालवून जवळपास दोन तास प्रशिक्षणाचा वर्ग सुरू ठेवण्यात आला होता. यामुळे अनेक नगरसेवकांनी व सभा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशिक्षण पाच महिने उशिरा का घेण्यात आल. तसेच त्यासाठी सर्वसाधारण सभेचा वेळ फुकट का घालविला असा प्रश्न उपस्थित केला जात असून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला आहे. (प्रतिनिधी)च्महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. च्आता जास्तीत जास्त दोन सर्वसाधारण सभा होणार आहेत. यामुळे महापालिकेने टॅब खरेदीवर केलेला सर्व खर्च व्यर्थ गेला असून त्याचा पालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी काहीही उपयोग झालेला नाही.