Join us

कर्जतमधून चोवीस अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 22:35 IST

कर्जत विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत 18 उमेदवारांचे 24 नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे दाखल झाले आहेत.

कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत 18 उमेदवारांचे 24 नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते महेंद्र थोरवे यांनी शिवसेना बंडखोर म्हणून आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने सेनेला धक्का बसला आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, मनसे, शेकाप, रिपाइं या प्रमुख पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभा मतदारसंघासाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कालर्पयत चार उमेदवारांचे सहा अर्ज दाखल झाले होते. गोपाळ शेलके-भारतीय कम्युनिस्ट पक्ष, रूपेश डोलस - बसपा, सुरेश लाड-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लीला ढुमणो-अपक्ष यांचे अर्ज दाखल झाले. आज भाजपाचे राजेंद्र येरुणकर, रमेश मुंडे, मारुती टोकरे यांनी शेकापचे नारायण डामसे, किशोर पाटील, महेंद्र थोरवे यांनी तर राष्ट्रीय काँग्रेस, शिवसनेचे हनुमंत पिंगळे, शिवाजी खारीक, मनसेचे जगन्नाथ पाटील, रिपाइंचे नरेंद्र गायकवाड, मारुती गायकवाड यांच्यासह अपक्ष म्हणून संजय अभंगे, खान अहमद, केतन घारे, महेंद्र थोरवे अशा 1क् उमेदवारांचे 25 अर्ज दाखल झाले आहेत. सुरेश लाड यांनी चार, भाजपाचे राजेंद्र येरुणकर यांनी दोन अर्ज दाखल केले. निर्णय अधिकारी बोरकर यांना तहसीलदार आणि साहाय्यक निर्णय अधिकारी रवींद्र बाविस्कर, दीपक आकडे, नायब तहसीलदार एल़ क़े खटके, अरुणा जाधव यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
 
च्शिवसेनेचे कर्जत उप तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेंद्र थोरवे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर आज त्यांनी प्रथम शिवसेना बंडखोर उमेदवार म्हणून सेना कार्यकत्र्यानी हजेरी लावली.
च्नंतर थोरवे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केला. 
च्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून कर्जतमध्ये कय होणार याची उत्सुकता वाढली आहे.