Join us

मुंबईत डेंग्यूचा बारावा बळी

By admin | Updated: November 9, 2014 02:40 IST

केईएम रुग्णालयात बुधवारी चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये मुंबईत डेंग्यूमुळे दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे.

मुंबई : केईएम रुग्णालयात बुधवारी चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये मुंबईत डेंग्यूमुळे दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. 
कुर्ला येथे राहणा:या सामिया शेख हिचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. सामिया हिला श्वास घेण्यास त्रस होत असल्यामुळे तिला पहिल्यांदा सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सामियावर प्राथमिक उपचार केल्यावर तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. केईएम रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिला ताप आणि श्वास घेण्यास त्रस होत होता. तिच्यामध्ये डेंग्यूचे कोणतेही लक्षण दिसून येत नव्हते. तिच्या प्लेटलेट्सदेखील कमी झाल्या नव्हत्या. मात्र डॉक्टरांनी रॅपिड टेस्ट केल्यावर त्याचा अहवाल पॉङिाटिव्ह आला. सामियावर आधी कार्डिअॅक विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र डेंग्यूचे निदान झाल्यावर तिला बालरोगतज्ज्ञ विभागात हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.