Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात काही भागांत वीज बंद

By admin | Updated: November 6, 2015 02:16 IST

महावितरणच्या ठाणे नागरी विभाग-२ च्या कार्यक्षेत्रातील वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे विभागातील काही परिसरांचा वीज

मुंबई : महावितरणच्या ठाणे नागरी विभाग-२ च्या कार्यक्षेत्रातील वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे विभागातील काही परिसरांचा वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.२२ के. व्ही. कळवा-२ या वीज वाहिनीवरील गणपती पाडा, फुले नगर, ईश्वर नगर, आनंद नगर, वाघोबा नगर, भोला नगर, शिवाजी नगर, सम्राट अशोक नगर, ठाकुरपाडा, मफतलाल कॉलनी, शांती नगर, गोपालराव नगर आणि २२ के. व्ही. खारेगाव या वीज वाहिनीवरून वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या जुना मुंबई-पुणे रस्ता, खारेगाव, पाखाडी, शिवसेना शाखा खारेगाव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, रघुकुल सोसायटी, आझोन व्हॅली, सांघवी व्हॅली, रेती बंदर या परिसरांचा वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)