Join us
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीकडून सिव्हील इंजिनिअरला लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:18 IST

दुपारच्या सुमारास शिवडीत एका तृतीयपंथीकडून सिव्हील इंजिनिअर तरुणाला लुटण्याचा प्रयत्न रविवारी शिवडीत झाला

मुंबई :  दुपारच्या सुमारास शिवडीत एका तृतीयपंथीकडून सिव्हील इंजिनिअर तरुणाला लुटण्याचा प्रयत्न रविवारी शिवडीत झाला. या दरम्यान बचावासाठी तृतीयपंथीने त्याला बलात्काराचा आळ घालण्याचीही धमकी दिली. मात्र तरुणाने त्याचा पाठलाग करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी शबाना मोहम्मद शेख (२१) या तृतीयपंथीला बेड्या ठोकल्या आहेत.

शिवडीचा रहिवासी असलेला शैलेश जगन्नाथ बारस्कर (३०) हा सिव्हील इंजिनिअर आहे. गोरेगाव येथील साईटवर सुपरवायझर म्हणून काम करतो. रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तो शिवडीच्या रस्त्याकडेला उभा होता. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या तृतीयपंथीने त्याच्या गळ्यातील चैन हिसकावली. बारस्करने त्याच्यामागे पळ काढत पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली.  तेव्हा, त्याने निकल जा, नही तो मैं तू मेरे साथ सोया था ’ बोलके इल्जाम लगाउंगी बोलत पळ काढला. बारस्करने त्याचा पाठलाग सुरु ठेवून पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. गस्तीवरील पोलीस तेथे धडकले. दोघांनीही तृतीयपंथीचा पाठलाग केला. पुढे काही अंतरावर क्रिकेट खेळणा-या मुलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तृतीयपंथीला पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणले. 

तेव्हा चौकशीत त्याचे नाव शबाना मोहम्मद शेख (२१) असल्याचे समजले. तो रे रोड येथील रहिवासी आहे. काळाचौकी पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली आहे