मुंबई : विक्रोळीत पत्नीची बदनामी करत असल्याच्या रागातून तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विक्रोळीतील हरियाली व्हिलेज परिसरात राहणाऱ्या आकाशचा सोमवारी नव्याने जबाब नोंदविण्यात आला. या जबाबामुळे नवीन माहिती समोर आली. या प्रकरणात एकूण ८ जणांचा समावेश आहे. सचिन चौरेने कामानिमित्त त्याला कमलेशच्या घरी बोलावले. तेथे त्याला दारू पाजली. तेव्हा कमलेश शेट्टीने चाकूने त्याचेगुप्तांग कापण्याचा प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र त्याने त्याला प्रतिकार केला. त्यापाठोपाठ त्याच्या अन्य मित्रांनीही त्याला लाथाबुक्क्यांसह बेल्टने विवस्त्र करून मारहाण केली. तर काहींनी सिगारेटचे चटके दिले. या प्रकरणी आतापर्यंत कमलेश शेट्टी, सचिन चौरे, जयेश गुलाब कांबळे, सूरज गायकवाड यांना अटक करण्यात आली असून, आता सूर्यकांत उर्फ कालु मनी शेट्टी आणि राजा स्वामी यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे. (प्रतिनिधी)विक्रोळी मारहाण प्रकरणी एकूण ९ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असे असूनही पोलिसांनी गांभीर्याने न पाहिल्याने तसेच आरोपींवर लावलेल्या कलमांमुळे त्यांची जामिनावर सुटका होत आहे. त्यामुळेच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी व आकाशला न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणाला बसत असल्याचे आकाशचा मित्र अश्विन भागवत याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुप्तांग कापण्याचा प्रयत्न
By admin | Updated: April 18, 2017 06:04 IST