खालापूर : खोपोली शहरातील एक ज्वेलर्स दुकान लुटण्याच्या प्रयत्नांत असणा:या दोन दरोडेखोरांना नागरिकांच्या दक्षतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . आरोपींकडून घरफोडी करण्यासाठी लागणारे हत्यार जप्त करण्यात आले असून लाखो रुपयांचा दरोडा रोखण्यात यश आले आहे .
शहराच्या जैन मंदिरसमोर नाकोडा भैरव ज्वेलर्स दुकान असून सायंकाळी मालक दुकान बंद केल्यानंतर दुकानाजवळ फेरफटका मारण्यासाठी रात्नी साडे अकरा ते बारा दरम्यान आले. तेव्हा त्यांना भिंत ठोकण्याचा लहान आवाज येत असल्याचे मालक सोहनलाल भूरमल पोरवाल यांच्या लक्षात आल्यानंतर मित्न परिवारासह शेजारील नागरिक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने पोलिसांनी ज्वेलर्स दुकानाच्या मागील बंद गाळय़ातून आवाज येत होता त्याचे शटर उघडल्यानंतर बंद शटरच्या आतील लाकडांमध्ये घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असणारे दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून घरफोडी करण्याकामी वापरण्यात येणारे हातोडी, स्क्रूड्रायव्हर,गॅस कटर हस्तगत केले.
यातील आरोपी मुखत्त्यार हुसेन शेख (52) आणि शौकत अल्ताफ शेख (51, मुंब्रा) यांना घरफोडी करण्याच्या गुन्हय़ाखाली अटक करण्यात आली आहे .
दुकान मालक आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यापूर्वी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी भिंत तोडण्याचे काम सुरु केले होते . जी हत्यारे हस्तगत केलीत ती घरफोडी करण्याकरिता वापरली जात असून या दोन आरोपी व्यतिरिक्त अन्य साथीदार असण्याची दाट शक्यता आहे. या घटनेने रात्नीची गस्त अधिक कडक करण्यात .
-जयसिंग तांबे,
पोलीस निरीक्षक, खोपोली