Join us

कर्ज देणाऱ्यावर विश्वास ठेवणे महिलेला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

कंपनीचा धनादेश दलालाच्या खात्यातकंपनीचा धनादेश दलालाच्या खात्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कंपनीच्या नावाने दिलेला धनादेश दलालाने स्वतःच्या ...

कंपनीचा धनादेश दलालाच्या खात्यात

कंपनीचा धनादेश दलालाच्या खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कंपनीच्या नावाने दिलेला धनादेश दलालाने स्वतःच्या खात्यात वळविल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील ३० वर्षीय तरुणीची यात फसवणूक झाली आहे. ती चेंबूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. लहान बहिणीच्या लग्नासाठी तिने एका नामांकित संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यावरून धनंजय मिश्रा याचे प्रोफाईल बहिणीला आवडले. लग्नपत्रिका न जुळल्याने या दोघांचे लग्न झाले नाही.

मिश्रा काम करत असलेल्या कंपनीकडून कर्ज पुरवठा केला जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार पैशांची आवश्यकता असल्याने तरुणीने मिश्रा याला कर्ज काढून देण्याबाबत विचारणा केली. ३० हजार रुपये कमिशन घेत मिश्रा याने जुलै २०१९ मध्ये तिला अडीच लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. पुढे, तरुणीने कर्ज कमी करण्यासाठी २ लाख रुपयांचा धनादेश देण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे मिश्रा धनादेश घेण्यासाठी आला. कंपनीच्या नावाचे स्पेलिंग चुकेल असे सांगून त्याने फक्त रक्कम लिहून सही केलेला धनादेश तरुणीकड़ून घेतला.

पुढे तो कर्ज देणाऱ्या कंपनीच्या खात्यात जमा न होता मिश्रा याच्या खात्यात जमा झाल्याचे समजले. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याच्याकडून टाळाटाळ झाली. कंपनीकड़ूनही पैसे जमा झाले नसल्याचे समजताच, तिने मिश्राकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. त्याने पैसे परत केले नाही. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.