तळोजा : सायन पनवेल मार्गावर बेलापूर येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. यामध्ये जिवीत हानी झालेली नसली तरी ट्रकमधील बियरच्या बाटल्यांचा रस्त्यावर सडा पडला. बियरचा ट्रक उलटला म्हणून परिसरातील तळिरामांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेल्या मद्याची लूट केली. यामुळे या मार्गावर तासभर वाहतूक कोंडी झाली होती.सकाळी १०च्या दरम्यान बेलापूर उड्डाण पुलाच्या संरक्षण कठडयाचा मोकळया भागावर भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक एमएच११/एसी/१८३४ हा चालकाचा ताबा सुटल्याने आदळला व डाव्याबाजूने गाडी कलंडून सीबीडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पलटी झाली. यात बियरच्या बाटल्या होत्या. बेलापूर ब्रिज जवळपास यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाल्याने कोकण भवन, सिडको भवन याठिकाणी पनवेल, कळंबोली, कामोठे मार्गे येणारे कामगारांचा खोळंबा झाला.(प्रतिनिधी)तळीरामांचा थर्टीफस्टबर्डवायजर कंपनीचे बियर बॉक्स रस्त्यावर अस्थाव्यस्त पडल्यानंतर ब्रिजखाली ठाण मांडणाऱ्या व काही भटक्या तळीरामांनी बाटल्यांची लूट केली आणि आठवडाभरआधीच थर्टीफस्ट साजरा केला.धोकादायक भिंतसीबीडी उड्डाणपुलाच्या सुरूवातीला मुंबईकडे जाणाऱ्या उजव्याबाजुला असलेल्या भिंतीवर अशा प्रकारे अनेक वाहने आदळली असून ही भिंत चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
बेलापूरला ट्रक उलटला
By admin | Updated: December 21, 2014 01:01 IST